HW News Marathi
क्राइम

अनिल देशमुखांच्या जावयाला अटक!

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत अजून भर पडली आहे. अनिल देशमुख यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी

आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने वरळी येथून कारमधून जातानाच रस्त्यात ताब्यात घेतलं आहे.

आपहाराण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप

अनिल देशमुख यांच्या जवायचं आपहरण झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगितलं जातंय. गौरव चतुर्वेदी यांच कुटूंब वरळी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलंय.

गौरव चतुर्वेदी यांच अपहरण झाल्याचा आरोप आहे.

देशमुखांविरोधात एकही पुरावा नाही

सीबीआयचे उपअधिक्षक आर एस गुंजाळ यांनी चौकशी अहवाल सादर केलाय. या अहवालात देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याची माहिती आहे.

ईडीचे आतापर्यंत पाच समन्स

अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स 25 जून रोजी देऊन 26 जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ 26 जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कालचं (18 ऑगस्ट) हे पाचव समन्स होत.16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख कालही चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

११ पोलीस अधिका-यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सन्मानित

News Desk

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या टायपिस्टला अटक

News Desk

धर्माबादमध्ये दगडाने ठेचून हत्या करणा-याला 24 तासात अटक

News Desk