मुंबई | पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहेत. सोमवारी पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा २३ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर ८८.१२ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. डिझेलच्या दरातही २२ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलसाठी वाहन चालकांना ७७.३१ रुपये इतके पैसे मोजावे लागणार आहेत. सततच्या या इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसने देशभरात भारत बंदची हाक दिली आहे. आज हा बंद यशस्वी करण्यासाठी देशातील २१ पक्षांनी पाठिंबा दिल्याचे पहायला मिळत आहे.
Petrol at Rs 80.73/litre (increase by Rs 0.23/litre) and diesel at Rs 72.83/litre (increase by Rs 0.22/litre) in Delhi. Petrol at Rs 88.12/litre (increase by Rs 0.23/litre) and diesel at Rs 77.32/litre (increase by Rs 0.23/litre) in Mumbai. pic.twitter.com/DqVtFusOdr
— ANI (@ANI) September 10, 2018
आज पेट्रोलच्या दरात २३, तर डिझेलच्या दरात २२ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे नवी दिल्लीत पेट्रोलचा दर ८० रुपये ७३ पैशांवर जाऊन पोहोचला आहे. तर एक लिटरसाठी डिझेलसाठी ७२.८३ रुपये मोजण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.