HW News Marathi
देश / विदेश

भीमा-कोरेगाव हिंसाचार, अटकेतील पाच कार्यकर्ते नक्षली संघटनेचे सदस्य

नवी दिल्ली | भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले पाच मानवी हक्क कार्यकर्ते हे हिंसाचाराच्या कटात सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालायला सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोटिसच्या उत्तरात दाखल केलेल्या शपथपत्रात महाराष्ट्र पोलिसांनी दावा केला होता.

हे पाच ही आरोपी समाजात मोठ्या प्रमाणात अराजकता माजवण्याचा प्रयत्नात होते. या प्रकरणात आज (गुरुवारी) सुरनावणी होणार आहे. तसेच पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, अटक करण्यात आलेले पाचही आरोपी सीपीआय (एम) या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ८ जानेवारी २०१८ ला नोंदवलेल्या एफआयआरनंतर तपास करूनच अटक करण्यात आली आहे.

 

एल्गार परिषद

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेसाठी माओवाद्यांनी पैसे पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. यापूर्वीही एल्गार परिषदेशी संबंधित सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांनाही अटक करण्यात आली होती. याबाबत कबीर कलामंचावर देखील पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला संशयित …..

Arati More

आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिसवा सरमांवर गुन्हा दाखल

News Desk

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दीड वर्षातच दिला राजीनामा

swarit