मुंबई | भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र नाही, तर देश हदरुन गेला होता. कोरेगाव भीमा दंगल भडकविण्यासाठी पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख एका पत्रात आहे. महाराष्ट्र अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदे घेऊन माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Investigation revealed that a big controversy was being plotted by Maoist orgs.The accused were helping them to take their goals forward. A terrorist org was also involved.On 17 May,sections under Unlawful Activities(Prevention) Act were imposed: PB Singh, ADG, Maharashtra Police https://t.co/QnXVicjbm9
— ANI (@ANI) August 31, 2018
भीमा-कोरेगाव भडकविण्यासाठी पाच लाख रुपये दिल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडे यांनी रोना विल्सन याला लिहिलेल्या पत्रामध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, देशात अराजकता निर्माण करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी दुसऱ्या देशातील शक्तींची मदत घेण्याच्या हालचालीही सुरू होत्या, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले आहे.
पंतप्रधानांच्या हत्येचा कट
भीमा-कोरेगाव दंगलसंदर्भात पुणे पोलिसांनी गेल्या दोन दिवासांपूर्वी देशभरात धाडी टाकल्या होत्या. या पाच व्यक्तींच्या घरी छापे टाकल्यानंतर तपासात मिळालेल्या ई-मेलमध्ये राजीव गांधी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाली होती. बंदी असलेल्या माओवादी संघटनांनी या कार्यकत्यांचा संबंध असल्याचे माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व व्हर्नोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.