HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीर | शोपियाँ जिल्ह्यातील अरहामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात ४ पोलीस जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावून पळ काढल्याचे माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि लष्कराचे जवान दाखल झाले आहेत. जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.

तसेच हिजबुल या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा रक्षकांनी ठार केले होते. यात हिजबुल संघटनेचा अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरू आणि त्याचा साथीदार उमर राशित या दोघांना जवानांनी ठार केले. या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीसांवर हा हल्ला करण्यात आले, असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

swarit

कश्मीरमध्ये भाजपच्या सचिवाची गोळ्या झाडून हत्या

swarit

नौदलाच्या पश्चिम विभागाचा नौदल अलंकरण समारंभ – 2022 मुंबईत संपन्न

News Desk
महाराष्ट्र

कळसकरचा ताबा मिळविण्यासाठी सीबीआयने केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

News Desk

मुंबई | सीबीआयने नालासोपारा स्फोटके प्रकरण आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर याचा ताबा मागणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाकडे केला होता. मुंबई सत्र न्यायालयाकडून मात्र सीबीआयचा हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. एखादी व्यक्ती एका तपासयंत्रणेच्या पोलीस कोठडीत असताना त्या व्यक्तीला दुसऱ्या तपासयंत्रणेच्या पोलीस कोठडीत देण्याचा युक्तिवाद मुळातच कायदेशीर नाही,असे सांगत मुंबई सत्र न्यायाल्याने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

शरद कळसकरला नालासोपारा स्फोटके प्रकरणात तसेच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. सीबीआयला एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकर आणि सीबीआयच्या ताब्यात असलेल्या सचिन अंदुरे यांना एकत्र बसवून चौकशी करायची होती. परंतु पुणे कोर्टाने २३ ऑगस्टला कळसकर विरोधात प्रॉडक्शन वॉरंट जारी केले त्याचवेळी सीबीआयने कळसकरचा ताबा घेण्यासाठी कोर्टाकडे अर्ज का केला नाही, पाच दिवस वाया का घालवले, असा प्रश्नही मुंबई सत्र न्यायालायने केला.

Related posts

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पराभव निश्चित – राहुल गांधी

swarit

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

नागपूरवाले मला मध्येच म्यूट का करतायत? मुख्यमंत्र्यांचा मिश्किल सवाल

News Desk