मुंबई | राष्ट्राभिमानी समितीच्या वतीने मुंबईत अनोखे रक्षाबंधन पार पडले. राष्ट्राभिमानी समिती आणि ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या वतीने जनसामान्यांच्या रक्षणार्थ दिवसरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा ही न करता कार्यरत असणारे अग्निशमन दलाचे जवान, वाहतूक पोलीस दल, माहीम पोलीस ठाणे, शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांचे ईश्वर रक्षण करो ह्याच भावनेने हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या पवित्र राख्या वनवासी क्षेत्रातील महिलांनी बनवलेल्या होत्या हे त्याचे महत्वाचे वैशिष्ट्य. महिलांमध्ये वनिता चेटियार, मालती मिसाळ, प्रियांका पळ आणि प्रज्ञा भिडे यांनी पुढाकार घेतला तसेच त्यांच्यासोबत प्रशांत पळ, मनोज मिसाळ,विलास फडके, राज दुदवडकर, शंकर भौमिक, संतोष नारायणे ह्यांनी त्यांना सहकार्य केले. समितीच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.