मुंबई | वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात जन्मलेले पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकांने या पेंग्विन पिल्लूची प्रकृती बुधवारी (२२ ऑगस्ट)ला ढासल्याने निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर उपचार दरम्यान मृतावस्थेत आढळून आले.
The baby penguin at Veermata Jijabai Bhosale Udyan & Zoo has died due to new born anomalies. The Humboldt Penguin chick had hatched out of the egg on 15th August 2018. #Mumbai pic.twitter.com/TSEjx3qSd4
— ANI (@ANI) August 24, 2018
या पेंग्विन पिल्लूच्या मृत्यूनंतर गुरुवारी (२३ ऑगस्ट) रोजी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. नवजात पिल्लामध्ये आढळणाऱ्या विसंगतीच्या कारणाने आणि यकृतातील बिघाडाने त्यांचा मृत्यू झाला अंदाज मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ञ या विभागामधील प्राध्यापकांच्या पधकाने शवविच्छेदनात यांनी वर्तविला आहे.
दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्विनपैकी एका पेंग्विनच्या अंड्यात प्राणिसंग्रहालयात १५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या पेंग्विनच्या अंड्यामधून या पेंग्विनचा जन्म झाला होता. त्यामुळे भारतात जन्मलेला पहिला पेंग्विन होण्याचा मान या पेंग्विनला मिळाला होता. तसेच राणीच्या बागेत चिमुकल्या पेंग्विनच्या आगमनाने येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गही आनंदित होता. मात्र या पेंग्विनच्या मृत्यूमुळे हा शोककळा पसरली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.