HW News Marathi
महाराष्ट्र

दाभोळकर हत्या प्रकरण | आणखी तिघेजण ताब्यात, स्फोटकांचा साठा जप्त

औरंगाबाद | अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करणाऱ्या आरोपी सचिन अंदुरेला सीबीआयने आधीच अटक केली आहे. त्याचप्रमाणे अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दाभोळकरांच्या हत्येचे सूत्रधार असल्याची माहिती देखील सीबीआयने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटे एटीएसच्या पथकाने सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घराची झडती घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे.

औरंगाबादमधील पैठण आणि देवळाली येथे मंगळवारी पहाटे सचिन अंदुरेचा चुलत भाऊ आणि मित्रांच्या घरी एटीएसच्या पथकाने धाड टाकली. त्यांच्या घरातील स्फोटकांचा साठा जप्त करून त्यांना एटीएसने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. सचिन अंदुरेने हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करायचे असल्याचे सांगून सीबीआयने सात दिवसांच्या पोलीस कोठडी मिळवली होती. या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीतून धक्कादायक खुलासे

अमोल काळे, वीरेंद्र तावडे दाभोलकरांच्या हत्येचे सुत्रधार | सीबीआय

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण, अंनिसची ‘जवाब दो’ निषेध रॅली

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुका घ्या मुका प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहात?” संजय राऊतांचा सवाल

Aprna

जळगावकडे जाताना एकनाथ खडसेंच्या गाडीचा अपघात, सर्वजण सुखरुप

News Desk

पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk