HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण, अंनिसची ‘जवाब दो’ निषेध रॅली

पुणे | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)चे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (२० ऑगस्ट)ला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतिदिनी राज्यभरातील विविध ठिकाणी रॅली काढण्यात येणार आले आहे. पुण्यातील ओंमकारेश्वर पूल ते साने गुरुजी स्मारक या मार्गावरून ‘जवाब दो’ निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या केली. या पुलाजवळ अंनिसचे कार्यकर्ते जमले आहेत. ‘मारेकरी सापडला, सुत्रधार कधी?’ सापडणार असा सवाल विचारला जात आहे. या रॅलीत मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, मेधा पानसरे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी या रॅलीत सहभागी झाले आहेत.

अंनिसाच्या ‘जवाब दो’ निषेध रॅलीनंतर सकाळी ११ वाजता. ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे चर्चासत्र होणार असून त्यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर आणि तुषार गांधी सहभागी होणार आहेत.

कोल्हापुरात ‘निर्भय बनो मॉर्निंग वॉक’

कोल्हापुरात ‘निर्भय बनो मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका मारेकऱ्याला अटक केली असून दुसऱ्या मारेकऱ्याचा शोध सुरू आहे. तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम परिसरात ‘निर्भय बनो मॉर्निंग वॉक’ रॅली काढण्यात आली.

Related posts

अवैधरित्या सागवान तस्करी करणारा टेंम्पो भोकर वनविभागाने पकडला

News Desk

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापुजा

Aprna

कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्टक …पावसाचं कमबॅक ?

News Desk