HW News Marathi
देश / विदेश

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह मुंबई-पुण्याहून ८१ डॉक्टरांची टीम केरळला रवाना

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टीमुळे संकटात अडकलेल्या केरळ राज्याला महाराष्ट्राकडून मदतीचे प्रयत्न सुरु आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे जे रुग्णालयाचे ५५ डॉक्टर्स तर पुण्यातील ससून रुग्णालयाचे २१ डॉक्टर्स अशी एकूण ८१ डॉक्टर्सची टीम केरळला रवाना झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून केरळमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने निर्माण पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत ३८५ जण मृत्युमुखी पडले आहेत. सरकारी बचाव शिबिरात २० लाख नागरिकांना आश्रय मिळाला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर केरळमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला रवाना होत आहेत.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून २० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. तसेच पूरग्रस्तांच्या मदतकायार्साठी एक नियंत्रण कक्षही मंत्रालयात सुरु करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

News Desk

उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव

News Desk

एकाच दिवसात तीन वेळा पाकच्या ‘नापाक’ कारवाया

News Desk