HW News Marathi
देश / विदेश

संगणक युगाची ओळख करून देणाऱ्या राजीव गांधी यांची ७४ वी जयंती

गौरी टिळेकर | स्वतंत्र भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे राजीव गांधी यांची आज ७४ वी जयंती आहे. राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबई येथे झाला. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी ते देशाचे पंतप्रधान पदी विराजमान झाले होते. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा राजीव केवळ तीन वर्षांचे होते. त्यांची आई इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान आणि भाऊ संजय गांधी सक्रिय राजकारणात असूनही राजीव गांधी हे कायमच राजकारणापासून दूर राहिले.

राजकारणात प्रवेश

१९८० साली संजय गांधी यांच्या निधनानंतर मात्र राजीव यांनी राजकारणात प्रवेश केला. पुढे १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लोकसभा निवडणुका घेतल्या. त्यात काँग्रेसला मागील सात निवडणुकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळाला. पक्षाने ५०८ पैकी ४०१ जागा मिळवून एक मोठा विक्रमी विजय मिळाला होता. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळत होता.

भारत एकसंघ ठेवण्याव्यतिरिक्त २१ व्या शतकातील भारत निर्माण करणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. नोव्हेंबर १९८२ मध्ये भारताने आशियायी क्रीडा स्पर्धेचे यजमानपद घेतले होते. यावेळी क्रीडासंकुल उभे करणे व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यात आली होती. राजीव गांधी यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. राजीव गांधी यांनी दक्षतेने हे आव्हानात्मक काम पूर्ण केले.

संगणक युग

राजीव यांनी सर्वप्रथम भारताला संगणक युगाची ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवातदेखील त्यांच्याच धोरणांतून झाली. आधुनिक विचार व अदभूत निर्णयक्षमता असलेले राजीव गांधी भारताला जगातील उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण करू इच्छित होते.

राजीव गांधींचे छंद

राजीव यांना राजकारणात रस नव्हता हे स्पष्ट होते. त्यांच्या वर्गमित्रांनुसार राजीव गांधी यांच्याकडे विज्ञान व इंजिनीअरींगची बरीच पुस्तके असत. शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. आधुनिक संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्य व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आवडत असे. त्यांना छायाचित्रण व रेडिओ ऐकण्याचाही छंद होता.

वैमानिक राजीव गांधी

विमान उड्डाण ही त्यांची सर्वात मोठी आवड होती. त्यामुळेच इंग्लंडहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती पत्र मिळवले. लगेचच ते इंडिअन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी व्हॉटस्ॲप प्रयत्नशील

News Desk

अखेर कर्नाटकच्या राजकीय नाट्यावर पडदा, बी एस येडियुरप्पांचा राजीनामा

News Desk

सामंत गोयल यांची ‘रॉ’च्या प्रमुखपदी निवड

News Desk