HW News Marathi
देश / विदेश

भाजपाचा पाया खचला, दिर्घ आजाराने वाजपेयींचे निधन

मुंबई | एकेकाळी ज्यांच्या कवितांनी लोक मंत्रमुग्ध व्हायचे त्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दिर्घ आजाराने आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. २५ डिसेंबर १९२४ ला ग्वाल्हेरमध्ये एका शिक्षकाच्या घरात अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला. ग्वॉल्हेरच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये वाजपेयी यांचे शिक्षण झाले. आज ते कॉलेज लक्ष्मीबाई कॉलेज म्हणून ओळखले जाते. राज्यशास्त्रात एम ए झालेले वाजपेयी आयुष्यभर अविवाहित राहिले. राजकारणात येण्यापुर्वी वाजपेयींनी मासिक राष्ट्रधर्म, साप्ताहिक पांचजन्य व स्वदेश आणि वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणूनही काम पाहिले.

१९५१ ला स्थापन झालेल्या भारतीय जन संघाचे संस्थापक सदस्य अशी वाजपेयी यांची ओळख . वाजपेयींच्या राजकारणातला सुरवातीचा काळ हा फार खडतर होता. लोकसभेची पहीली पोट निवडणुक वाजपेयी लखनऊ मधून लढले व पहील्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर भारतीय जनसंघाने १९५७ मध्ये वाजपेयींना लखनौ, मथुरा आणि बलरामपूर अशा तीन मतदारसंघांमधून मैदानात उतरवले. लखनौतून वाजपेयींचा पराभव झाला तर मथुरा मतदारसंघात त्यांची जमानत रक्कमच जप्त झाली. पण बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होत वाजपेयी पहिल्यांदा संसदेत पोहोचले ही वाजपेयींच्या चार दशकांपेक्षा जास्त काळाच्या संसदीय कारकिर्दीची ही सुरुवात होती.

१९६८ ते १९७३ या काळात वाजपेयी भारतीय जन संघाचे अध्यक्ष होते. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणिबाणी विरोधात वाजपेयी खंबिरपणे उभे राहिले. आणिबाणीच्या काळात तर वाजपेयींना तुरुंगवासही भोगवा लागला पण तरीही त्यांनी पक्ष कार्यात खंड पडू न देता पुढे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य म्हणून १९७७ ते १९८० या काळात वाजपेयींनी पक्षबांधणीचे काम केले.१९८० ते १९८६ या अवघड काळात वाजपेयींनी भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. अकराव्या लोकसभेत वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते मात्र विरोधी पक्षात असतांना देखील वाजपेयी सतत सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर धारेवर धरत. दुस-या लोकसभेपासून तेराव्या लोकसभेपर्यंत वाजपेयी खासदार होते. मात्र त्यानंतर १९८४ मध्ये ग्वॉल्हेर मतदारसंघात वाजपेयींचा माधवराव शिंदेंनी पराभव केला होता. त्यानंतर पुन्हा वाजपेयी संसदेत परतले आणि पंतप्रधानही झाले.

भारतीय जन संघ आणि पुढे भारतीय जनता पार्टीला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप परिश्रम त्यांनी घेतले. या दोन्ही पक्षांच्या जडणघडणीत आणि विस्तारात वाजपेयींचा मोलाचा वाटा आहे. एकेकाळी लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व हीच भाजपची ओळख होती. मात्र आज ही परीस्थीती राहीली नाही. सत्तेबाहेर गेलेल्या नेत्याला लोक विसरतात हा समज आहे मात्र वाजपेयींनी हा समज खोटा ठरवला. सक्रीय राजकारणापासून दुर गेल्यावरही अटल बिहारी वाजपेयींना जनता विसरली नाही प्रतिकूल परिस्थितीत जनसंघ आणि पुढे भाजपला दिशा देत सत्तेचे दिवस दाखवणारे सर्वसमावेशक नेतृत्व अशीच अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख यापुढेही राहिल..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याविरूद्ध FIR दाखल 

News Desk

मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मराठा आरक्षण | ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करा, राज्य सरकारची मोदींकडे मागणी

News Desk