HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याविरूद्ध FIR दाखल 

जयपूर | राजस्थानमध्ये काँग्रेस – भाजपमध्ये अस्थिरता, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने भाजप सोबत षडयंत्र रचले होते, असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला होता.

कॉंग्रेसने आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी राजस्थान सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेते संजय जैन आणि कॉंग्रेसचे आमदार भंवर लाल शर्मा यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ टेपबाबत त्यांनी अनेक खुलासे केले. वायरल ऑडिया क्लिप नंतर काॅंग्रेस पक्षाने सचिन पायलट यांचे समर्थक असलेल्या दोन आमदारांचं पक्षाचं सदस्यत्व रद्द केले आहे. आमदार भंवरलाल शर्मा आणि माजी मंत्री विश्वेंद्र सिंग यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाहीत !

Gauri Tilekar

पंतप्रधान मोदींना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

केंद्रीय अर्थसंकल्प आज जाहीर होणार, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ वाजता बजेट मांडणार!

News Desk