HW News Marathi
देश / विदेश

सोमनाथ चॅटर्जी यांच्याविषयी थोडक्यात… 

मुंबई | सोमनाथ चॅटर्जी यांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी झाला. चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी नेते होते. ते १४ व्या लोकसभेचे सभापती होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान मतदारसंघातून आणि १९७७ व १९८० च्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगाल राज्यातील जादवपूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते.

१९८४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी जादवपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. त्यानंतर ते १९८५ मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बोलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पुढे १९८९ , १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी त्याच मतदारसंघातून विजय मिळवला.

अभ्यासू वृत्ती,आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव पाडला. जुलै २००८ मध्ये मनमोहन सिंह सरकारवरील विश्वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी लोकसभा अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सभाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. त्या कारणावरून त्यांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी २००९ ची लोकसभा निवडणुक न लढवता सक्रिय राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राहुल गांधींसोबत अशी काय झाली चर्चा ?

News Desk

UNSCमध्ये रशियाविरोधात ‘व्हिटो पॉवर’चा वापर, जाणून घ्या…नेमके काय आहे

Aprna

दिवस मावळल्यानंतरही लाईट लावून फडणवीसांचा पाहणी दौरा सुरूच

News Desk
देश / विदेश

BREAKING | माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

News Desk

कोलकाता | माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. बुधवारी त्यांना कोलकात्यामध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किडनीशी निगडीत आजारामुळे चॅटर्जी होते त्रस्त. वयाच्या ८९ वर्षी घेतला अखेरचा श्वास .

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमनाथ चॅटर्जी यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

 

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन. सोमवारी सकाळी ८.१५ मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास.

लोकसभेचे माजी सभापती आणि १० वेळा खासदार असलेले श्री सोमनाथ चटर्जी यांच्या निधनाने वृत्त कळल्यानंतर दु:ख झाले. चॅटर्जी हे ज्ञानरुपी संस्था होते. अशा दु:खद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. असे ट्विट करत राहुल गांधी यांनी सोमनाथ चॅटर्जी यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

१० वेळा खासदार असलेले सोमनाथ चटर्जी यांच्या निधनामुळे आम्ही अत्यंत दु: खी आहोत. लोकसभेतील कठीण प्रसंगी देखील उचित निर्णय घेणारे चॅटर्जी एक आगळवेगळ व्यक्तीमत्व होते. लोकसभेचे सभापती म्हणूनही त्यांची अनेकदा प्रशंसा करण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत.

 

माजी खासदार व माजी लोकसभा अध्यक्ष श्री सोमनाथ चटर्जी हे भारतीय राजकारणाचे प्रबोधक होते. त्यांनी आपल्या संसदीय लोकशाहीला अधिक मजबूत आणि श्रीमंत बनविले. त्यांनी गरिबांच्या आणि असुरक्षित लोकांच्या भल्यासाठी नेहमी आवाज उठविला. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून प्रचंड दुःख झाले. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील धरण परिसरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं!

News Desk

मिग-२७ विमान कोसळले, अपघाताच कारण अस्पष्ट 

News Desk

‘काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात’शरद पवारांच्या भेटीवर अमित शहा बोलले !

News Desk