मुंबई| मुंबई आयआयटीच्या ५६ व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित रहाणार आहेत. यावेळी मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर देखील उपस्थित राहणार आहेत.
Leaving for Mumbai, where I will join the convocation ceremony at IIT-B. Looking forward to interacting with bright youngsters. Will also inaugurate the new building of the Department of Energy Science and Engineering as well as Centre for Environmental Science and Engineering.
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2018
सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोमेश टी वाधवानी यांना आयआयटीकडून डी लिट पदवी प्रदान केली जाईल. तसेच दीक्षांत समारंभानंतर पर्यावरण विज्ञान अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतींचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.