HW News Marathi
देश / विदेश

बलात्कार पीडितेचा फोटो वापरण्यास सक्त मनाई | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | अल्पवयीन मुलींवर बलात्कार पीडित मुलींचे फोटो वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. या पीडितेचे फोटो ब्लर अथवा मॉर्फ करून वापरू शकत नाही. कारण बलात्कार पीडितांची ओळख मीडियाकडून जाहीर होण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कारण काश्मीरमधील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून पीडितेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात प्रसार माध्यमांनी पीडित मुलीचा फोटो आणि नावही जाहीर केले होते. या प्रकरणानंतर माध्यमांला न्यायालयाने फटकारले होते. यानंतर न्यायालयाने पीडित मुलीं विशेष करून अल्पवयीन मुलींचे फोटो वापरण्यास मीडियाला सक्त मनाई केली आहे.

बलात्कार प्रकरणात रिपोर्टिंग करणाऱ्या माध्यमांना सूचना

बिहारमध्ये मुजफ्फरपूर येथील बालिकाश्रमातील मुलींवर झालेल्या बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुओ मोटो दाखल करून घेतली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणात न्यायालयाने महिला आणि बालविका मंत्रालय आणि बिहार सरकार नोटीस पाठवली आहे.

तसेच याप्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला दिले आहेत.या बलात्कार प्रकरणातील एकाही पीडित मुलीचे फोटोसमोर येणार नाही, यांची काळजी घ्या, अशी सूचना न्यायालायने या प्रकरणाचे रिपोर्टिंग करणाऱ्या माध्यमांना विशेष सूचना दिल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या प्रत्येकाचा आम्हाला अभिमान-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

News Desk

आसामची सत्ता आरएसएसचे चड्डीवाले नाही चालविणार !

News Desk

मी कर्ज फेडेन पण व्याज देऊ शकणार नाही !

News Desk