HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार | मुख्यमंत्री

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच आंदोलनात पोलिसांवर देखील हल्ले करण्यात आले. पोलिसांवर हल्ले करणाऱ्याला अभय दिले जाणार नाही, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाच्या संघटनांनीही सरकारला सहकार्य करावे. तसेच मराठा समाजाच्या सर्व संघटनांशी चर्चा करण्यास मी तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले. मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल आल्यानंतर तत्काळ निर्णय घेतला जाईल, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री काय बोलले

  • मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे
  • पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही
  • मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार
  • मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल आल्यानंतर तत्काळ निर्णय घेतला जाईल.
  • मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याची तक्रार आली आहे.
  • मेगा भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही.
  • सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी तयार
  • सर्व संघटनांनाकडून सहकार्याची अपेक्षा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर

swarit

लातूरमध्ये परिचारक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

News Desk

१५ ऑगस्टपासून मराठा समाजाचे ‘अन्नत्याग’ आंदोलन

swarit