HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी सांगली दौरा पुढे ढकलला

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सांगली दौरा पुढे ढकलला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यावर मराठा आंदोलनाचे सावट असल्याने हा दौरा पुढे ढकलन्यात आला आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी वाळवा तालुक्यातील आष्टा येथील अतिरिक्त तहसिल कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम आणि सांगली महानगरपालिकेच्या प्रचार सभेसाठी सांगली दौऱ्यावर जाणार होते.

परंतु मुख्यमंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत वाळवा तालुक्यात पाय ठेवू द्याचे नाही, असा निर्णय मराठा समजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला. गेल्या काही वर्षाच्या मागणीनंतर आष्ट्यात अतिरिक्त तहसिल कार्यालय करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान सांगली आणि मिरजमध्ये मुख्यमंत्र्याच्या सभा होणार होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी, विनायक राऊत यांनी केली मागणी

News Desk

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी संघटना आक्रमक!

News Desk