HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानमध्ये पीटीआय पक्षाची आघाडी

इस्लामाबाद | पाकिस्तानमध्ये बुधवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आले. यानंतर रात्री मतमोजणीला देखील सुरुवात झाली. यामध्ये माजी क्रिकेटर इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने आघाडी घेतली आहे.

पाकिस्तानच्या एकूण २७२ जागांसाठी मतदान झाले होते. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार इम्रान खान यांच्या पीटीआयला १२२ जागांवर आघाडी मिळीली आहे. तर दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम-लीग-नवाझ (पीएमएल) ५६ जागा, पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ३४ जागांवर आघाडीवर आहेत.

तसेच लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. सईदचा मिल्ली मुस्लिम लीगला आतापर्यंत एकाही जागा मिळाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१०% आरक्षणच हवं होतं तर मग मोर्चे आणि बलिदान का दिलं ?”, संभाजीराजेंचा सवाल

News Desk

हिमाचल प्रदेशमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, ४४ जणांचा मृत्यू

News Desk

“शेतकऱ्यांनी आपल्या घरी परत जावं!”, मोदींचं आंदोलन करणाऱ्यांना आवाहन

News Desk