HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा समाजाचे मुंबईत ठिय्या आंदोलन

मुंबई । मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण लागू व्हावे, २० जुलै पासून मराठा समाजाने ठिय्या आंदोलन पुकारले आहे. परळी येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून मुंबईमधील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरु झाली आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत सरकारने मेगाभरती थांबवावी. अशी आंदोलकांनी मागणी केली . दरम्यान सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला. यावेळी आयोजक युवराज सूर्यवंशी, महेश राणे, अभिजित सावंत, सूयाजी पाटील, इ. आयोजक उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नाथाभाऊंच्या प्रदीर्घ अनुभवाचा आम्हाला फायदा होईल – धनंजय मुंडे

News Desk

रत्नागिरीतील मरकजहून आलेल्यांपैकी १ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

हॉलिडे एक्स्प्रेसचे चाक तुटले, मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प

News Desk
महाराष्ट्र

पंढरपुरात मुस्लीम बांधवांनी आज कुर्बानीशिवाय केली बकरी ईद साजरी

News Desk

पंढरपूर | महाराष्ट्रासह संपूर्ण भारत बकरी ईद आज अगदी उत्साहामध्ये साजरी होत आहे. मात्र पंढरपूरमधील आजची ईद विशेष कारणामुळे चर्चेत आहे. पंढरपूर येथील मुस्लीम समाजातील बांधवांनी आज श्रावणी एकदाशी आणि बकरी ईद एकाच दिवशी साजरी होत असल्यामुळे, बकऱ्याची कुर्बानी न देता केवळ नमाज पठण करुन ईद साजरी केली. या आगळ्या वेगळ्या ईद साजरा करण्याच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा पंढरपूरमधील हिंदू- मुस्लीम एकात्मतेचे दर्शन झाले.

पंढरपूरमध्ये मागील अनेक दशकांपासून हिंदू- मुस्लीम समाज एकोप्याने नांदत आहे आणि आज मुस्लीम समजाने घेतलेले निर्णय हा त्याचीच पोचपावती आहे. याआधीही अशाप्रकारे एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली होती, त्यावेळीही मुस्लीम समाजाने कुर्बानी रद्द करत नमाज पठण करुन ईद साजरी केली होती.

आज श्रावणी शुद्ध एकदशी असल्याने तीन लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. मंदिर परिसराबरोबर चंद्रभागा नदीच्या तिरावर आणि प्रदक्षिणा मार्गावर हजारोच्या संख्येने भाविक आहेत. तर मुस्लिम समजासाठी महत्वाचा समजला जाणारा बकरी ईदचाही सण आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना बकरी ईददरम्यान देण्यात येणाऱ्या कुर्बानीचा त्रास होऊ नये म्हणून मक्का मशिदीचे इमामसाब हाफिज शेख, अध्यक्ष निसरभाई शेख आणि समस्त मुस्लीम बांधवांनी आज कुर्बानीशिवायच बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Related posts

इम्तियाज जलील यांचा जल्लोष पाहिल्यानंतर अमेय खोपकर म्हणाले नाचताना शरम वाटली पाहिजे

News Desk

राज्यातील मोफत लसीकरणाबाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात…

News Desk

…पण तेव्हा कधी शेतकऱ्यांनी पिकं फेकून देण्याची वेळ आणली नाही

News Desk