HW News Marathi
देश / विदेश

राहुल गाधींच्या वक्तव्याने मोदी झाले अवाक

नवी दिल्ली | संसदेत आज मोदी सरकार विरोधात असलेल्या अविश्वास ठरावावर प्रत्येक पक्षाला आपले मांडण्यासाठी वेळ देण्यात आली होती. कॉंग्रेस पक्षाला ३८ मिनिट वेळ देण्यात आली होती. त्यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी बोलताना अनावधानाने मोदी बार जाते है, असे वक्तव्य केले.

राहुल यांच्या या वक्तव्यानंतर लोकसभेत एकच खळबळ उडाली. यावेळी लोकसभा खासदार २ मिनिट अवाक झाले होते. खरे तर राहुल गांधींना मोदी बाहर जाते है, असे म्हणायचे होते मात्र त्यांच्या तोंडातून चुकून बार जाते है, असे बोलले गेले. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी योग्य शब्दाचा वापर केला.

दरम्यान, राहुल गांधींनी मोदींच्या परदेश दौऱ्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी परदेश दौऱ्यावर किती खर्च केला? याची आकडेवारी देखील यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजरसह ४ जवान शहीद

News Desk

UK च्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड

Aprna

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमध्ये दाखल, होणाऱ्या पत्नीमध्येही कोरोना सदृश्य लक्षणे

News Desk