HW News Marathi
कृषी

शेतक-याने दिल्या जानकरांना शिव्या

अहमदनगर | राज्यात दूध दरवाढीवरुन तसेच दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान राज्यसरकारने द्यावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संप पुकारला आहे. दूध दरवाढीच्या मुद्द्यावरुन संतप्त झालेल्या शेतकऱ्यांने दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांना फोनवरुन शिवीगाळ केली आहे. नगर पोलिसांकडून यासंदर्भात माहिती प्राप्त झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील मांडवे येथील शेतकरी सदाशिव निमसे यांनी महादेव जानकर यांना फोन केला होता. त्यावेळी बोलताना निमसे यांनी यावेळी त्यांनी शिवीगाळ केल्याचा जानकर यांचा आरोप आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना फोनवरुन माहिती दिली. या प्रकरणानंतर शिव्या देणारे शेतकरी निमसे सध्या फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्यांचा शोध घेत आहे. निमसेंना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

News Desk

फळं खरेदीसाठी चीनी व्यापारी शेतक-यांच्या बांधावर

News Desk

भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

News Desk