HW News Marathi
देश / विदेश

समलैंगिकतेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार

नवी दिल्ली | समलैंगिकता हा अपराध मानणाऱ्या आयपीसी ३७७ कलम घटनाबाह्य करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. न्यायायातील ५ न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या निर्णयावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

२००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एकमेकांच्या सहमतीने ठेवण्यात आलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर आक्षेप घेत समलैंगिक संबंधास आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये अवैध ठरवले. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणारा निकाल दिला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय घेते हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

आयपीसी कलम ३७७ म्हणजे काय ?

आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये दोन लोक एकमेकांच्या सहमतीने किंवा असहमतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करतील तर समलैंगिकता हा गुन्हा ठरविण्यात येतो. या कलमानुसार गुन्ह्यातील आरोपींना १० वर्षापासून ते जन्मठेपपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पीएफ’मुळे नोकरदारांची चिंता वाढली

News Desk

त्रिपुरामध्ये मोदी सरकारचा विजयरथ

News Desk

राज्यसभेत निलंबित झालेल्या रजनी पाटील यांच्याकडे काँग्रेसने सोपवली ‘ही’ जबाबदारी

Aprna
महाराष्ट्र

पंढरपुरमध्ये रामदास आठवलेंच्या हस्ते शालेयवस्तूंचे वाटप

News Desk

पंढरपूर | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथील संत गाडगे बाबा आणि संत चोखा मेळा वसतिगृह आणि गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

भीमजयंती निमित्त होणारा खर्चातील अतिरिक्त खर्च टाळून येथील रिपाइंचे शहर अध्यक्ष संतोष पवार यांच्या पुढाकारातून जय भीम तरुण मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आल्याबद्दल केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी संयोजकांचे कौतुक केले.

यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र्र प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे तसेच आय पी एस अधिकारी निखिल पिंगळे, आप्पासाहेब जाधव, सुनील सर्वगोड, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, दीपक चंदनशिवे, कुमार भोसले, कैलास कांबळे, संतोष सर्वगोड, समाधान लोखंडे, दयावान बाबर, रौनक शहा, संतोष इंगळे, बाळासाहेब सर्वगोड, उदय मुळे, अॅड. किर्तीपाल सर्वगोड, प्रवीण मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार जाणार ही निव्वळ अफवा उलट भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत यायला आतुर – नवाब मलिक

News Desk

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॅाझिटिव्ह

News Desk

पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती! – मुख्यमंत्री

Aprna