HW News Marathi
मुंबई

मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस

मुंबई | मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस असल्यामुळे ठिकठीकाणी पाणी जमले आहे. सध्या कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्या कडून वर्तविण्यात आला आहे.

शहराच्या माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे सखल भागात पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. पश्चिम उपनगरात मात्र पावसाचा जोर पहायला मिळत आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. तुर्तास पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत आहे. मुलुंड, घाटकोपरमध्येही रिमझिम पाऊस आहे. मात्र ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये पावसाची तुफान पाऊस सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरू असून येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये येत्या 24 तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संपादरम्यान बेस्टचे १९.८८ कोटींचे नुकसान

News Desk

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली? काय आहे पार्श्वभूमी

Seema Adhe

डोंबिवलीतलं अतिक्रमण पाडायला प्रशासनाला वेळ नाही

News Desk
महाराष्ट्र

माधवराव भिडे यांचे अल्पशा आजाराने निधन

News Desk

मुंबई | सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडेंचे आज ७ जुलै २०१८ रोजी मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ होते. भिडे यांच्या पश्चात पत्नी डॉ. इरावती, पुत्र सुहास व राजीव, दोन स्नुषा, नातवंडे व हजारो मराठी उद्योजक आहेत. रेल्वेमधून चीफ इंजिनीअर म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी भिडे असोसिएट्स नावाने स्वत:ची कंपनी सुरू केली.

मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी सन २००० मध्ये त्यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ४५ हून अधिक चॅप्टर असून, १७०० हून अधिक उद्योजक सदस्य आहेत. भिडे यांनी १९८९ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजिनीअर्स या सेतू उभारणाऱ्या अभियंत्यांची संस्था उभारली. माधवराव भिडे यांच्या जाण्याने मराठी उद्योजक पोरका झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Related posts

‘मिहान’ मधील प्रकल्पांना सवलतीच्या दरात वीज देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार! – सुभाष देसाई

Aprna

एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला,घरची परिस्थिती हलाखीची असतानाही बँकेची परीक्षा पास झाली, डेंग्यूने तरुणीचा जीव घेतला.:

News Desk

भंडाऱ्याच्या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, रोहित पवारांचा विश्वास

News Desk