HW News Marathi
महाराष्ट्र

तासगावात चिकनगुनियाची साथ, नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष  

सांगली | तासगावामध्ये गतवर्षी डेंग्यू व चिकनगुनियाची साथ आली होती. यंदाही पुन्हा तासगाव शहरात चिकनगुनियाने थैमान घातले आहे. परंतु तासगाव नगरपालिकेचे मात्र याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. सर्व खाजगी रुग्णालयात व दत्तमाळावरील सरकारी रुग्णालयांमध्ये चिकनगुनियाचे रूग्ण पहायला मिळत आहेत.

तर नगरपालिकेकडून बोगस औषध फवारणी केली जात असल्याचे स्थानिकांचे मत आहे. तासगावातील नामवंत डॉक्टर व राजकिय नेत्यांनाही चिकनगुनिया झाल्याचे पहायला मिळत आहे. आरोग्य अधिका-यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या मुख्याधिकारी गणेश शिंदे हे कोणती ठोस पाऊले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वच्छता करण्यासाठी नगरपालिकेने नेमलेले ठेकेदार हे औषध फवारणी केल्याचा आव आणत सोशल मिडियावर फोटो वायरल करुन मोकळे होतात. मग चिकनगुनियाची साथ आली कशी ? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांचेही तासगाव शहराकडे दुर्लक्ष झाले आहे. नगरसेवकांनी आपल्या वॉर्डमध्ये स्वच्छता ठेकेदारांकडून काम करुन घेणे आवश्यक होते. परंतु ही स्वच्छता वेळेत न झाल्यामुळे पावसाळा सुरु होताच नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी पोहोचलो रे हिमालयात”; महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

Manasi Devkar

शेतकरी संघटनांच्या देशव्यापी ‘चक्का जाम’ला काँग्रेसचा पाठिंबा!: बाळासाहेब थोरात

News Desk

लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक, दोन गटात हाणामारी

News Desk