HW News Marathi
मनोरंजन

अभिनेता सलमान खानला वनविभागाची नोटीस

मुंबई |अभिनेता सलमान खानच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसत आहे. पनवेल येथील वजापूर परिसरात अर्पिता नावाचे सलमान खान परिवाराचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये सलमान खानने बेकायदेशीर रित्या बांधकाम केल्याने त्याला वनविभागाने नोटीस पाठवली आहे. 2003 मध्ये पर्यावरणासाठी संवेदनशील म्हणून ही जागा घोषित केली होती. त्याच जागी बेकायदेशीर बांधकाम उभारल्याने सलमानला वन विभागाने नोटीस बजावली आहे.

पनवेल येथील अर्पिता फार्म हाऊसमध्ये सिमेंट आणि कॉक्रेटीकरण केले असून ते पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक असल्याचे सांगत वन विभागाने नोव्हेंबर 2017 रोजी सलमानला नोटीस पाठवली होती. त्यानंतर पुन्हा सलमानला 9 जून 2018 साली नोटीस पाठवण्यात आली. एका आठवड्यात आपले म्हणणे मांडण्याचे या नोटीसीत म्हटले होते. परंतु सध्या या नोटीस बाबत मीडियाशी बोलताना सलमान खान यांचे वडिल सलीम खान यांनी सांगितले की, हे फक्त आरोप आहेत. आम्ही योग्य वेळी उत्तर देऊ, मला आता काही नाही बोलायचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चुंबक’ ठरला उत्कृष्ट मराठी सिनेमा

News Desk

‘जे.जे.’मध्ये कोरिया-मुंबईतील ‘बियाँड द फ्रेम्स’ चित्रप्रदर्शन

News Desk

Kumbh Mela 2019 : आता कुंभमेळ्यात कुणी हरवल्यास चिंता नसावी

News Desk