नागपूर | आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे पावसाळी अधिवेशन २० जुलैपर्यंत असणार आहे. या अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्द गाजणार आहे. यांचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी संभाजी भिडे यांची वेशभूषा परिधान करुन विधीमंडळात दाखल झाल्यानंतर सर्वांच्या लक्षात आले.
संभाजी भिडे यांना आतापर्यंत अटक होणे गरजेचे होते. परंतु सरकारने भिडे यांना अटक केली नाही. भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणी आणि मनुस्मृती ही पहिली राज्यघटना असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले होते. या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यावरुन सरकारकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही.
व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारवर टीका
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी पत्रकार परिषध घेवून व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. व्यंगचित्राचा आधार घेऊन विरोधकांनी महाराष्ट्राचे फिस्कटलेले चॅलेंज, शेतकरी कर्जमाफी, रोजगार आणि महागाई या विविध मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला. पावसाळी अधिवेशनच्या पूर्व संध्येलाच विरोधक व्यंगचित्रात दाखविलेल्या सर्व मुद्द्यांवरुन सरकारची कोंडी करणार असल्याचे दिसून येत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.