HW News Marathi
राजकारण

शिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता शिवसेनेनेही पाठिंबा दिला आहे. केजरीवालांसोबत जे काही होत आहे ते चुकीचे आहे, असे म्हणत शिवसेनेने केजरीवालांचे समर्थन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार यांच्यातील राजकीय तणाव वाढला असुन “अरविंद केजरीवाल करत असलेले आंदोलन अनोखे आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत: केजरीवाल यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

राऊत यांनी “केजरीवाल दिल्लीसाठी चांगले काम करत असून त्यांचे सरकार दिल्लीच्या जनतेतून निवडून आलेले आहे. सध्या जे काही होतं आहे ते लोकशाहीसाठी घातक आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेने बरोबरच ममता बॅनर्जींचा टीएमसी, चंद्राबाबूंचा टीडीपी, एच डी देवेगौडा यांचा जेडीएस, झारखंडमधील ‘झारखंड मुक्ती मोर्चा’, नॅशनल काँन्फरंस तसेच इतर डाव्या पक्षांनीही केजरीवालांचे समर्थन केले आहे.

Related posts

मुख्यमंत्री फडणवीस स्वर्गीय वसंतराव नाईक यांचाही रेकॉर्ड तोडतील !

News Desk

अखेर संजय राऊत तुरुंगातून बाहेर, पहिलीच प्रतिक्रिया देत म्हणाले…

Aprna

एकनाथ शिंदेंकडे कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी

News Desk
मुंबई

सर्व शिक्षा अभियान प्रवेश प्रक्रियेत बदल, गरजवंताना मिळणार न्याय

News Desk

मुंबई | केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियान RTE अंतर्गत २५ % आर्थिक दृष्टया कमकुवत गरीब लोकांच्या मुलांसाठी खाजगी शाळांमध्ये राखीव जागांमधील प्रवेश प्रक्रियेत गेल्या ३ वर्षात नियमानुसार १ कि.मी.अंतरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या मुलांना प्रवेश मिळत नव्हता. मात्र ३ कि.मी. अंतराच्या बाहेरील लोकांच्या मुलांना सहज प्रवेश मिळत होते त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत होता. गेल्या ३ वर्षात कोणीच राजकीय पक्षाच्या लोकांनी त्याकडे लक्ष दिले नाही किंवा त्याचा फायदा आपल्या मतदारांना मिळवून देताना दिसला नाही.

मात्र यावर्षी माहीम मधील ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या आणि साने गुरुजी विद्यालयाच्या पुढाकाराने ह्या अभियानाचे मार्गदर्शन शिबीर आणि मदत केंद्र चे आयोजन केले गेले. फक्त तितकेच न करता ह्या प्रक्रियेतील त्रुटी आणि घोळ पुराव्यानिशी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना निवेदनासोबत सादर केले. पालकरांनी यामध्ये जातीने लक्ष घालून ते पुढील कारवाईस पाठवले. संस्थेने ह्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना देखील त्याबाबत एक निवेदन दिले.

सदर बाब हि योग्य असल्याचे सिद्ध झाल्यावर राज्य सरकारने त्यात त्वरित बदलाव करून यापुढे स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिले जाईल व ते हि जमिनीवरून त्यांचा पत्ता जवळचा असल्यासच. कारण आजपर्यंत विभागा द्वारे पत्ता तपासणी झाल्यामुळेच घोळ झाला. तसेच यापुढे ह्या प्रक्रियेसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भासणार नाही. शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल संस्थेने शिक्षण अधिकारी महेश पालकर यांचे व राज्य सरकारचे आभार मानले तसेच समाधान व्यक्त केले कारण यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही असे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पळ यांनी सांगितले. संस्थेचे विलास फडके ,राज दुदवडकर, भरत राऊत, योगेश सारंगुळ, वनिता, प्रथमेश पाटील,किरण पळ , विनोद पळ यांनी अथक मेहनत घेतली.

Related posts

चक्क ट्रक चोरी करून गुजरातला पळाले अन्…; पहा कसं पकडलं मुंबई पोलिसांनी

Chetan Kirdat

ठाण्यात मिसळ महोत्सवाचेभव्य आयोजन

News Desk