HW News Marathi
राजकारण

राजकारण व्यासपीठ आणि छत्रपती

सातारा | छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातले राजकीय वितुष्ट जगजाहीर आहे. त्यातच हे दोघे एकाच व्यासपीठावर आले तर लोकांना आश्चर्याचा धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. परंतु चक्क एकाच व्यासपीठावर या दोघांना पाहून अनेकजण आवाक झाले. निमित्त होते सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा बक्षीस समारंभाचे. या बक्षिस समारंभाला उदयनरोजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही उपस्थित राहिले होते.

अनेक दिवसांपासून या दोन्ही राजांमध्ये राजकारणावरुन जोरदार टीका सुरू आहे, परंतु या कार्यक्रमात मात्र पहिल्यांदा शिवेंद्रराजे भोसले आले त्यानंतर पाच मिनीटांनी उदयनराजे भोसले आले, एकाच व्यासपिठावर हे दोघे आल्यामुळे उपस्थितांपैकी अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, दोघे एकाच व्यासपीठावर असल्यामुळे कदाचित एकमेकांशी संवाद साधतील असे वाटणा-या अनेकांचा यावेळी अपेक्षा भंग झाला असेच म्हणावे लागेल. या कार्यक्रमात दोघेही शेजारी बसले होते मात्र एकमेकांशी काहीच बोलले नाहीत.

Related posts

राज्यात जनतेच्या मनातले सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न !

News Desk

संजय राऊतांची ED कोठडी वाढणार की जामीन मिळणार?

Aprna

राहुल गांधींनी मागितली सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी

News Desk
मुंबई

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

News Desk

मुंबई – मुंबई विद्यापिठात निकालांचा झालेला गोंधळाला विद्यापिठाते व्हाईस चांसलर म्हणजे व्हिसी डॉ. संजय देशमुख यांना जबाबदार धरत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र सर्व जबाबदारी व्हिसींवर टाकून त्यांना बडतर्फ करणे ही पळवाट आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. व्हिंसींना जर बडतर्फ केले जात असेल तर शिक्षण खाते सांभाळणारे शिक्षण मंत्री व्हिटी म्हणजेच विनोद तावडेंनाही बडतर्फ केले पाहीजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. मलिक यांनी यावेळी तावडे यांची संभावना व्हि. टी. अशी केली. तावडे हे अकार्यक्षम मंत्री असल्याचा घणाघातही त्यांनी केला. बोगेस डिग्री घेणारा शिक्षण मंत्री बोगस काम करत आहे असा टोलाही त्यांनी तावडेंना लगावला.

मुंबई विद्यापिठाचे संपूर्ण जगात एक वेगळे स्थान आहे. पण या निकाल प्रकरणा वरून संपूर्ण जगात या विद्यापिठाची नाचक्की झाली आहे. त्याला देशमुख आणि तावडे हे दोघेही जबाबदार आहेत. देशमुख यांचा राजिनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने वारंवार केली होती. मात्र त्यांना अभय दिला जात होता. आता त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. तशीच कारवाई आता मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांवर करावी असेही ते म्हणाले.

Related posts

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

News Desk

वरळीतील कोरोनाबाधितांसाठी पोदार रुग्णालयात सुरु केले स्वतंत्र कोरोना कक्ष

News Desk

परकीयांना भारतीय मिरचीची भूरळ

News Desk