HW News Marathi
देश / विदेश

जैश-ए-मोहम्मद कडून स्टील बुलेटचा वापर

जम्मू काश्मीर | मागील काही दिवसात रमजान महिना असल्याने दहशतवादी कारवाया ह्या कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु आता रमजान महीना संपला असून परत एकदा ह्या दहशतवादी कारवाया सुरु झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परंतु हाती आलेल्या माहीतीनुसार जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना ‘Ak-47’ रायफलमध्ये स्टील बुलेटचा वापर करत आहे. बंदूकीच्या या गोळ्यांमध्ये अॅन्टी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीच्या दरम्यान वापरल्या जाणाऱ्या बुलेट प्रूफ बंकरांना उद्धस्त करण्याची क्षमता आहे.

लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जानेवारीत पहिल्यांदा ही बाब समोर आली होती. जेव्हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील लाथपुरा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यांनी पुरविलेल्या बुलेटप्रूफ शील्ड (ढाल) च्या मागे असुनही अर्धसैनिक बलाच्या एका जवानाला गोळी लागली होती. आरपीएफचे 5 जवाण देखील यावेळी शहीद झाले होते. संशोधनात हे सिद्ध झाले आहे की ‘Ak-47’ रायफलने चालविलेल्या ह्या गोळ्या स्टीलच्या म्हणजेच टंगस्टन कार्बाईडच्या बनवल्या गेल्या होत्या. त्या सुरक्षा दलाच्या बुलेटप्रूफ ढालीलाही छेदण्यास सक्षम आहेत. काश्मिरमध्ये करण्यात आलेल्या शोधकार्यादरम्यान जैश-ए-मोहम्मद यांच्या भागातून मोठ्या प्रमाणावर स्टीलचे बुलेट्स जप्त करण्यात करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वाती महाडिक आज सैन्यात रुजू होणार

News Desk

काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेप, NIA च्या विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

Aprna

विवाहितेवर दहा दिवस अमानुष बलात्कार

News Desk