HW News Marathi
महाराष्ट्र

भिडेंच्या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलकडून निषेध

पुणे | वंध्यत्वावर आंब्याचा उपाय सांगणा-या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर सेलकडून निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धी माध्यमांना शनिवारी दिले आहे.

संभाजी भिडे यांनी केलेले वक्तव्य शास्त्रीय आधारावर नाही. तसेच हे वक्तव्य समाजाची दिशाभूल करणारे असल्याचे म्हणत शासनाने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, असे डॉ. जगताप यांनी या पत्रकात म्हटले आहे. मुलगाच होण्याबद्दल जाहीर वक्तव्य केले जाते, आणि अद्याप त्यावर कारवाई होत नाही, हे खेदजनक आहे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकरी संपाची तीव्रता अधिक वाढली

News Desk

शरद पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल, उद्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया

News Desk

खड्ड्यांविरोधात ते झाले अर्धनग्न!

News Desk
मुंबई

ईदच्या दिवशी अचानक झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

News Desk

मुंबई | मुंबईसह देशभरात आज रमजान ईदचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक सरकारी कार्यालयांना सरकारी सुट्टी देण्यात आली असली तरीही प्रायव्हेट कंपन्यांचे कर्मचारी सकाळी कामावर जाताना पहायला मिळाले. सकाळी नमाज अदा करण्याची वेळ असल्यामुळे मुंबईसह उपनगरात मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांनी एकच गर्दी केली होती. ईद निमित्ताने पाहुण्या रावळ्यांकडे जाण्याची घाई असल्याने मुंबईकरांना ट्रॅफीक चा सामाना करावा लागला. त्यातच अंधेरी चकाला येथे दुचाकी आणि महापालिकेच्या कचरा गाडीच्या झालेल्या अपघातामुळे या मार्गावर बराच वेळ ट्रॅफीक जाम झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

चकाल्यावरुन जे. बी. नगरच्या दिशेने जात असलेल्या MH 02 DX 5021 ही दुचाकी महापालिकेच्या कचरा गाडीला MH 01 BR0048 धडकल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीचे प्रंचड नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. या अपघातामुळे सकाळी ऑफीसला जाणा-या अनेकांचा बराच वेळ खोळंबा झाला होता. या अपघातानंतर काही क्षणात पोलिस घटनास्थळी हजर झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने दुचाकी स्वार आणि महापालिका सुपरवाईजर यांनी सेटलमेंट केली. यासंदर्भात अधिक विचारणा केली असता दुचाकीस्वार अॅडव्होकेट अबु खान यांनी महापालिका झालेल्या नुकसानाची भरपाई देणार असल्याचे HW मराठी शी बोलताना सांगितले.

Related posts

मुंबईतील चौपाट्या आता लवकरच होणार चकाचक

swarit

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कल्याण ते अंबरनाथदरम्यान पॉवरब्लॉक

News Desk

उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांने केलीआत्महत्या

swarit