HW News Marathi
मुंबई

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कल्याण ते अंबरनाथदरम्यान पॉवरब्लॉक

मुंबई | हार्बर आणि पश्चिम मार्गावर आज (९ जून) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत पॉवर ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यान पुलाच्या गर्डर दुरुस्तीचे काम करण्यात येईल. मध्य रेल्वे मार्गावर घेण्यात येणार आहे. या वेळेत कल्याण ते बदलापूर लोकलसेवा बंद असेल. तर बदलापूर ते कर्जत विषेश लोकल चालवण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही.

वांद्रे, गोरेगाव ते सीएसएमटी सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.१६ पर्यंत लोकल सेवा बंद असेल. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशीपर्यंत सकाळी ९.५३ ते सायंकाळी २.४४ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सीएसएमटी ते गोरेगाव, वांद्रे येथे सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत लोकल सेवा बंद असेल.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे येथे सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत तसेच चुनाभट्टी, वांद्रे ते सीएसएमटी येथे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत लोकलसेवा बंद असेल. वाशी, बेलापूर, पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.२३ पर्यंत लोकल धावणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मुलाच्या तुलनेत मुलीचा जन्मदर कमी

News Desk

पानपट्यावर चॉकलेट, वेफर्स आणि बिस्किट विकण्यास बंदी

News Desk

पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड

News Desk