HW News Marathi
देश / विदेश

बजरंग दल, विहिंप भारतातील धार्मिक दहशवादी संघटना

नवी दिल्ली | अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने जगभरातील देशांमधील राजकीय दबाव गट आणि त्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. तसेच या यादीमध्ये भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल या दोन्ही संघटनांना धार्मिक दहशवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. या दोन्ही संघटना धार्मिक दहशतवादी संघटना (Militant Religious Organization) असल्याचे सीआयएने घोषित केली आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना (Nationalist Organization) असे देखील म्हटले आहे. यामध्ये विविध देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दूरसंचार, परिवहन, लष्कर, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि राजकीय पक्षांबाबतच्या माहितीचा यात समावेश आहे.

तसेच ठराविक विचारसरणीचा अवलंब करणाऱ्या संघटनांना कट्टरतावादी किंवा दहशतवादी संबोधल्यामुळे बजरंग दल आणि विहिंपने दहशतवादी शिक्का हटवा नाही. तर आम्ही कायदेशीर कारवाई करु, असा इशारा या दोन्ही संघटनांनी सीआयएला दिला आहे.

सीआयएने जाहीर केलेल्या यादी भारतातील अजून ७ संघटनांचा समावेश आहे. सीआयएने त्यांना विविध श्रेणीमध्ये ठेवले आहे. यात जम्मू काश्मीरमधील ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी गटात, तर जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचा बजरंग दल आणि विहिंपप्रमाणे कट्टरतावादी संघटनेच्या गटात समावेश केला आहे.

 

Related posts

आता अवघ्या चार तासांमध्ये उपलब्ध होणार पॅनकार्ड

News Desk

“आम्ही हवतर त्यांना बँडबाजा पुरवतो…पण गुजरातचं सरकार बरखास्त का केलं नाही?” 

News Desk

मद्रास न्यायालयाने ‘टिकटॉक अ‍ॅप’वरील बंदी उठवली

News Desk