HW News Marathi
राजकारण

संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे

मुंबई | श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं अजब विधान केले त्यावर त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे मात्र शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून गुरुजींची तुफान स्तुती केली आहे. शिवसेनेने संभाजी भिडेंची तुलना थेट बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी केली आहे. संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे ‘सामना’त म्हटले आहे.

काय म्हटलं आहे ‘सामना’ त ?

“हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत.“भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे.त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो, पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत.

“कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके–४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोतच. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून गुरुजींची पाठराखण केल्याने काय प्रतिक्रिया उमटतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देश सध्या अवघड परिस्थितीतून जात आहे | प्रणव मुखर्जी

News Desk

नितीन गडकरींनी नौदलाची माफी मागावी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

News Desk

महाराष्ट्राचा कारभार सचिवांकडून नव्हे लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे! : अतुल लोंढे

Manasi Devkar