HW News Marathi
व्हिडीओ

“पर्यटन मंत्र्यांच्या हट्टापायी पैशाचा…”; Nitesh Rane यांचा Aaditya Thackeray यांच्यावर हल्लाबोल

मुंबईत गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आलेल्या दर्शक गॅलरीवरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही दर्शक गॅलरी पर्जन्यजलवाहिनीवर उभारण्यात आली असून समुद्रात पिलरही टाकण्यात आले आहेत, यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झालं असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी यासंबंधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिलं आहे. “मुंबईला पर्यटनाच्या दृष्टीने सुशोभित करून पर्यटकांना आकर्षित केलेच पाहिजे ही आमचीदेखील भूमिका आहे. पण असे करताना कुठल्याही अवैध कार्यपद्धतीने जनतेच्या पैशाचा गैरवापर होता कामा नये. हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी एमआरटीपी कायद्याने आपल्यावर टाकली आहे,” असं नितेश राणे यांनी सांगितलं.

#NitishRane #BJPShivsena #AadityaThackeray #NarayanRane #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अब्दुल सत्तारांना सुप्रिया सुळेंबद्दलचं वक्तव्य भोवणार?

Manasi Devkar

Bharat Jodo यात्रेत सहभागी झालेल्या दिव्यांग व्यक्तीला भेटले Rahul Gandhi

News Desk

प्रक्षोभक भाषणे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न!- Dilip Walse Patil|

News Desk