HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ इशारानंतर राऊतांनी ट्वीटद्वारे दिले ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई | संजय राऊत यांच्याकडून माझी सारखी चेष्टा केली जाते. पण, ती त्यांच्या अंगावर येणार आहे, असे मला वाटते, अशा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने केलेल्या कारवाईत डायरी सापडली. यातून मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखाचे घड्याळ दिल्याचे माहिती डायरीतून आयकर विभागाल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. 

यशवंत जावध यांच्यावर प्रतिक्रिया करताना बोलताना पाटील म्हणाले, “डायरी सापडली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही. परंतु, मला असे वाटते की, खूप काही तरी होणार आहे. संजय राऊत वारंवार माझी चेष्टा केली जाते. पण, ती त्यांच्या अंगावर येणार, असे मला वाटते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या वक्तव्यावर राऊतांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले, “नव्या धमकी बद्दल धन्यवाद.महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्या बाबत जी भाषा तुम्ही वापरता.चेष्टा करता ते सहन करायचे ? शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय,” असा टोला त्यांनी लगावला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांविरोधात २३ जुलैला सर्वोच्च न्यायालय देणार अंतिम निकाल

News Desk

“अरे बापरे मला भीती वाटतेय…पण सामना वाचायला लागलात चांगली गोष्ट आहे!”

News Desk

“भगव्याला हात लावाल तर झेंडा खिशात ठेवून दांडा घालू”, राऊतांचा कन्नडिगांना इशारा

News Desk