HW News Marathi
महाराष्ट्र

ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी करत लोकार्पण! – गोपीचंद पडळकर

सांगली | ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी करत लोकार्पण केले आहे. आमच्या दृष्टीने लोकार्पण सोहळा पार पडला, असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आधीच सांगलीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोकार्पण केली आहे. सांगलीमधील  अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे श्रेयवादावरून लोकार्पणाचा वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आज (२७ मार्च) मोर्चा काढला आहे. परंतु, पळकर आणि खोत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. 

पडळकर म्हणाले, ” पापी लोकांच्या हस्ते लोकार्पण होण्यापेक्षा मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर होणे हे आम्हाला समाधान आहे. २१ व्या शतकात टेन्कोलॉजीचा वापर करत ड्रोनद्वारे मेंढपाळांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्टवृष्टी केली आहे. आमच्या दृष्टीने लोकार्पण सोहळा पार पडला असून सरकारने जन भावनेचा आदर करावा. आम्ही पोलिसांना सहकार्य करतोय. शांतते कार्यक्रम होऊ घ्याव्या, अशी विनंती प्रशासनाला केली आहे. कार्यक्रमाला गालबोल लावण्याचा प्रयत्न करू नका.. पोलिसांनी आमच्या चार पोलांना ताब्यात घेतले असून त्या सोडाल्याशिवाय आमचे काम पूर्ण होणार नाही” अशी प्रतिक्रिया पडळकरांनी दिली. या पार्श्वभूमीवर २ एप्रिलपर्यंत सांगलीत जमाव बंदी लागू करण्यात आली.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा’, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

News Desk

लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार, चारही आरोपींना बेड्या

swarit