HW News Marathi
महाराष्ट्र

पेनड्राईव्हवर आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू; संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

मुंबई | भाजपच्या घरात रोज पेनड्राइव बाळंत होतात का बघावे लागेल. पेनड्राईव्हवर आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू. रोज एक खोट प्रकरण तयार करत आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर लगावला आहे. विधानसभेत काल (२५ मार्च) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  पुन्हा एकदा पेनड्राईव्हचा उल्लेख केला. यावेळी फडणवीसांनी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर राऊतांनी आज (२५ मार्च) पत्रकारांशी बोलताना फडणवीस आणि भाजववर कोपरखळी मारली. 

राऊत म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची हात मिळवणी सुरू आहे. यांच्या मिलिभगत सुरू असून त्यातून असे दिसते की, महाराष्ट्रातील सरकार चालू द्याचे नाही. भाजपला राज्य सरकार खोट्या प्रकरणातून उद्ध्वस्त करायचे आहे. त्यामुळे ते म्हणातात की, याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू हे असे चालले आहे. त्यांना ज्या ज्या लोकांना तुरुंगात पाठवायचे, त्यांची यादी तयार करा. महाराष्ट्रातील २५ लोकांना तुरुंगात टाकायचे आहे. आधी तुरुंगात टाका मग आमच्यावर आरोप करा काही हरकत नाही.”

महाराष्ट्रात सध्या इकक्या नीच आणि हलकट पातळीवरचे राजकारण महाराष्ट्रात आधी कधीही झाले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहे का? उलट तुमचे संबंध आहेत. यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? बघावं लागेल. आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन. रोज एक खोट प्रकरण तयार करता कसे, रोज नवीन बाळंतपण जमतं काय माहिती. महाराष्ट्रात हे नवीनच आहे रोज नवीन एक पेनड्राईव्ह बाळंतपण होत आहे.

भाजपला दाऊद आणि पाकिस्तानने सुपारी दिली 

मुंबईचे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्यावर बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील पोलीस दलाचे खच्चीकरण करायचे. बागवान यांनी २६/११ हल्ल्यात जीवाची बाजी लावून इस्रायल मुलाला वाचवले आहे. तुम्ही आमच्या प्रशासनाचे खच्चीकरण करतात. त्याप्रमाणे असे वाटते की, दाऊदने यांना सुपारी दिली आहे. या लोकांना पाकिस्तानने सुपारी दिली आहे की काय. अल कायद्याचा अजंडा हा होता का ?, असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा मराठवाडा, माझे नांदेड आणि माझा महाराष्ट्र या भूमिकेतून विकासाला न्याय देऊ! – अशोक चव्हाण

Aprna

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”, फडणवीसांचा राऊतांना टोमणा

News Desk

गेल ऑम्वेट यांचं आज निधन!

News Desk