HW News Marathi
महाराष्ट्र

नाविन्यपूर्ण रीतीने व कालानुरूप सकारात्मक बदल करून राबवत गरजूंना लाभ देण्याचे नियोजन – धनंजय मुंडे

मुंबई | सामाजिक न्याय विभाग राज्यातील वंचित उपेक्षित घटकांच्या वैयक्तिक लाभ व विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व थेट जोडलेला असून या विभागातील योजना सर्वसामान्य गरजूंना लाभदायक आहेत या सर्व योजनांचा बारकाईने अभ्यास करून नावीन्यपूर्ण रीतीने व कालानुरूप सकारात्मक बदल केल्याने या योजनांचा लाभ खऱ्या गरजू पर्यंत पोहचावा असे नियोजन सामाजिक न्याय विभागाने केली असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल (२३ मार्च) विधानसभेत बोलताना केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील विविध योजना, विधानसभा सदस्यांच्या त्यानुरूप असलेल्या मागण्या यासंबंधी विधानसभा सभागृहात आयोजित अनुदान मागण्यांवरील चर्चेला मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. यावेळी धनंजय मुंडे यांनी सर्व सदस्यांच्या प्रश्नांना सकारात्मक व समाधानकारक उत्तरे दिली. दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीच्या कामास गती देण्यात आली असून, स्वाधार शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती आदी योजनांच्या कक्षा रुंदावल्या असून, यासाठी कुठेही निधीची अडचण भासणार नाही, असे मंत्री मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

औरंगाबाद येथे सामाजिक न्याय विभागाच्या 11 एकर जागेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी एक पंचतारांकित शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली.यावेळी धनंजय मुंडे यांनी विभागामार्फत दिव्यांग, ऊसतोड कामगार, तृतीयपंथीय यांसह विविध लाभार्थी समाज घटकांसाठी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजना व खर्च केलेल्या निधीची माहिती सभागृहाला दिली. तसेच सभागृहातील चर्चेदरम्यान सदस्य आमदारांनी केलेल्या विविध मागण्यांचाही सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेऊन, असे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे’

News Desk

हिंगणघाट जळीतकांड म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

swarit

“साहेब, किती हा भाबडेपणा?”; फडणवीसांनी शरद पवारांना डिवचलं

News Desk