HW News Marathi
महाराष्ट्र

ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

मुंबई | चेंबूर येथील महावीर डेव्हलपर्सवर मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ११५ नुसार काल (२० मार्च) रात्री १० नंतर बांधकाम करून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, तसेच परिसरात कचरा टाकणे यासारखे इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या साप्ताहिक लाईव्ह-स्ट्रीमिंग दरम्यान सांगितले. पांडे यांनी विकासकांना नियमांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास भारतीय दंड संहिता (IPC) कलमे दाखल केली जाऊ शकतात, असा इशारा दिला.

“गेल्या आठवड्यात मुंबईतील रिअल इस्टेट इंडस्ट्रीतील सदस्यांचा समावेश असलेली CREDAI-MCHI या सर्वोच्च संस्थेसोबत आमची बैठक झाली पण विकासकांनी माझ्या सूचना हलक्यात घेतल्या होत्या. चेंबूर बिल्डर प्रकरणात, त्यांनी स्लॅब टाकणे आणि रात्री 10 वाजेनंतर ध्वनी प्रदूषण करणे सुरू ठेवले, आता त्यांना समजेल की नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल” असे पांडे यांनी त्यांच्या तिसऱ्या फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत त्यामुळे…

News Desk

सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचं विधान

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षपूर्ती मुलाखत लवकरच प्रदर्शित होणार…

News Desk