HW News Marathi
महाराष्ट्र

यशवंत जाधव मुंबईतील जुन्या पघडीच्या ३६ इमारती विकत घेतल्या! – किरीट सोमय्या

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव मुंबईतील जुन्या पघडीच्या ३६ इमारती विकत घेतल्या आहेत, अशा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जाधवांच्या आणि त्यांच्या निकटवर्ती यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. आयकर विभागाच्या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता आढळून आली.

आयकर विभागाने गेल्या आठवड्यात मारलेल्या छाप्या जाधव कुटुंबीयांच्या निकटवर्तीय सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापेमारी केली. या छाप्यादरम्यान आयकर विभागाने कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापले असून त्यांनी ते जप्त केले आहे. या पुराव्याच्या झाडाझडततून सुमारे १३० कोटी रुपयापेक्षा जास्त आणि ३६ जुन्या पघडीच्या इमारीत विकत घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे. जाघवांनी गेल्या दोन महिन्यात ३६ इमारती विकत घेतल्याची दावा सोमय्यांनी केला आहे.  

सोमय्यांनी ट्वीटमध्ये नेमके काय म्हटले

शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या ₹१००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. ED इ डी, कंपनी मंत्रालय, आयकर विभाग…द्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा, असे ट्वीटमध्ये म्हटले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवा मंत्रिमंडळाची पुनरर्चना, ‘त्या’ ४ आमदारांना मंत्रिपदाची शपथ

News Desk

“कागदावर शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळाले, पण…”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna

अजित पवार अन् नवनिर्वाचित कृषिमंत्र्यांची एकमेकांवर स्तुतीसुमने

News Desk