HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल परब यांच्या CA च्या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. सीएच्या मुंबईतील वांद्रे एमआयजी परिसरात एलिट इमारतीमध्ये छापेमारी सुरू आहे. तसेच आयकर विभागाने आज (८ मार्च) सकाळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी राहुल कनाल यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी केली आहे. परबांच्या सीएच्या कार्यालयात सीआयएसएफचे जवानांची एमआयजी फौज तैनात करण्यात आली आहे. परबांचे सीए हे त्यांचे निवासस्थान एआयजी क्लबच्या बाजुला राहतात. 

शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी राहुल कनाल यांच्या मुंबईच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. कनाल यांच्या घरी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. कनाल हे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाने आज  सकाळी आयकर विभागाचे एक पथकाने धाड टाकली.

तसेच परबांचे निकटवर्तीय असलेले संजय कदम यांच्या घरी देखील आज आयकर विभागाची धाड पडली आहे. कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी देखील आयकरने छापा टाकला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होती. जाधव यांच्या घरी आयकर विभागाने जवळपास चार दिवस हे धाडसत्र सुरू होते. 

केंद्रीय तपास यंत्रणा ही आता भाजपची प्रचार यंत्रणा झाले आहेत – आदित्य ठाकरे

कनाल यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडल्यानंतर महाविकासआघाडीचे नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकेर म्हणाले, “महाराष्ट्रावर याआधी देखील अशी आक्रमण झाली आहेत. हे दिल्लीचे आक्रमणचा आहे. आपण गेले काही दिवस पाहत असालच. जेव्हा राज्यात निवडणूक होणार आहेत. हे कळाल्यानंतर महाविकासआघाडीला भाजपची भीत वाटायला लागली. तेव्हापासून हे सर्व सुरू आहे. याआधी यूपी, हैदराबाद आणि बंगालमध्ये देखील असेच केले होते. महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे आता येथे देखील असेल होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ही आता भाजपची प्रचार यंत्रणा झालेली आहे. यामुळे महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अडतीस गाव पाणी पुरवठा सौर प्रकल्पामुळे २५ लाखांहून अधिक पैशांची होणार बचत! – छगन भुजबळ

Aprna

शरद पवारांना UPAचं अध्यक्ष करा आणि काँग्रेसचं पुनर्गठन करा, राऊतांचा काँग्रेसला सल्ला

News Desk

TRP घोटाळा – रिपब्लिक चॅनलच्या ३ अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

News Desk