HW News Marathi
महाराष्ट्र

शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

मुंबई | शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे ट्रस्टी राहुल कनाल यांच्या मुंबईच्या घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. कनाल यांच्या घरी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. कनाल हे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाने आज (८ मार्च) सकाळी आयकर विभागाचे एक पथकाने धाड टाकली.

गेल्या दिवसांपूर्वी शिवसेनेचे उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती. जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी चार दिवस सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे आज सायंकाळी ४ वाजता सेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राऊत कनाल यांच्या छापेसंदर्भात देखील बोलणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता राऊतांच्या पत्रकार परिषदेत सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 केंद्रीय तपास यंत्रणा ही आता भाजपची प्रचार यंत्रणा झाले आहेत – आदित्य ठाकरे

कनाल यांच्या घरावर आयकर विभागाची धाड पडल्यानंतर महाविकासआघाडीचे नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकेर म्हणाले, “महाराष्ट्रावर याआधी देखील अशी आक्रमण झाली आहेत. हे दिल्लीचे आक्रमणचा आहे. आपण गेले काही दिवस पाहत असालच. जेव्हा राज्यात निवडणूक होणार आहेत. हे कळाल्यानंतर महाविकासआघाडीला भाजपची भीत वाटायला लागली. तेव्हापासून हे सर्व सुरू आहे. याआधी यूपी, हैदराबाद आणि बंगालमध्ये देखील असेच केले होते. महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे आता येथे देखील असेल होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ही आता भाजपची प्रचार यंत्रणा झालेली आहे. यामुळे महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”, पडळकरांचं थोरातांच्या मुलीला प्रत्युत्तर

Ruchita Chowdhary

संजय राठोडांना ‘क्लिन चिट’ नाही! दिलीप वळसे पाटलांची माहिती

News Desk

शिवसेनेविरोधात भाजपचे षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप

News Desk