मुंबई | एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्राला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या वकिलांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिक हे ईडीच्या कोठडीत आहेत. या नोटीसनुसार, टाइम्स ऑफ इंडियामध्ये ३ मार्चला लेख ऑनलाइन प्रकाशनाने पोस्ट केला आहे. या लेखाच्या शीर्षकात म्हटले, “अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) माहिती मिळाली आहे की, मलिक हे गुजरातमधील एका फर्मशी जोडलेले आहेत. आणि या फर्ममार्फत मलिकांनी पाकिस्तानला CNG सिलिंडर निर्यात केले.” या लेखात ईडीकडून माहिती मिळाल्याचा दावा टाईम्स ऑफ इंडियाने केला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत पाकिस्तानला CNG सिलिंडर निर्यात केले, अशी माहिती ईडीने दिल्याचे म्हटले आहे. परंतु, ईडीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर कळाले की, मलिकांच्या केससंदर्भातील कोणतीच माहिती कोणत्याही वृत्तपत्राला दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यादरम्यान न्यायालयात मलिकांची केसवर सुनावणी सुरू असताना अशा प्रकारच्या बातम्या आल्यामुळे त्यांच्या केसवर देखील परिणाम पडले. तसेच मलिकांची समाजातील प्रतिष्ठेला धक्का पोचवणार असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी नोटीसमध्ये नमुद केला आहे.
या लेखा प्रकरणी मलिकांच्या वकिलांनी ५ मार्चला टाईम्स ऑफ इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य संपादक, पत्रकार या सर्वांना नोटीस पाठविली आहे. या प्रकरणी मलिकांच्या वकिलांनी टाईम्स ऑफ इंडियाला माफी मागण्यासाठी २ दिवसाचा कालावधी दिला आहे. जर दोन दिवसात टाईम्स ऑफ इंडियाने माफी नाही मागितली तर त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी तयार रहावे, असे देखील नोटीसमध्ये म्हटले आहे. या टाईम्स ऑफ इंडियाचे हे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याचे लक्षात घेऊन नोटीसीची एक प्रत पोलीस अधिकाऱ्यांना देखील पाठवली आहे. ज्यामुळे पोलीस त्यांच्या पद्धतीने या प्रकरणाची तपासणी करतील.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.