HW News Marathi
महाराष्ट्र

महापारेषणची नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणाचा समतोल राखणारी असावी! – डॉ. नितीन राऊत

मुंबई। विद्युतक्षेत्र महत्त्वाचे असून वीजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे योग्य वितरण करण्यासाठी पारेषण यंत्रणाही सक्षम आहे. महापारेषणच्या नियोजित इमारतीमध्ये वाशी परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे महापारेषणचे व्यवस्थापन व समन्वय चांगला होईल. त्याचबरोबर पर्यावरण समतोल राखण्यासाठी या इमारतीच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौरऊर्जेची यंत्रणा उभारावी, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

ऐरोली संकुलातील महापारेषणच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीचे मुख्य सल्लागार उत्तमराव झाल्टे, संचालक (संचलन) अनिल कोलप, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेंद्र वाळके, मुख्य अभियंता (स्थापत्य) भूषण बल्लाळ, अधीक्षक अभियंता पीयूष शर्मा, मोहन ननवरे उपस्थित होते.

प्रास्ताविकात संचालक (संचलन) अनिल कोलप म्हणाले, राज्य भार प्रेषण केंद्र वाशी परिमंडळातील २२ विभागीय कार्यालये एकाच ठिकाणी होणार आहेत. सर्व विभागीय कार्यालये सर्व सुविधायुक्त व पर्यावरणपूरक होणार आहेत. रूफटॉप, रेन वॉटर हार्वेस्टिंग व नैसर्गिक प्रकाश मिळण्यासाठीची व्यवस्था यामध्ये असणार आहे.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर वाशी परिमंडळाचे कार्यालय अपुऱ्या जागेत कार्यान्वित झाले होते. इतर कार्यालयेही ऐरोली संकुलात आहेत. महापारेषणची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी एकाच छताखाली सर्व कार्यालये होणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थापनाचा खर्च कमी होईल. तसेच अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढेल. संरक्षक भिंत व सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी. अग्निसुरक्षा व अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुसज्ज वसाहत, क्लब हाऊस, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटनसाठी क्रीडांगण, योगा कक्ष, वाचनकक्ष, आधुनिक ग्रंथालय, आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, जैवविविधतेच्या दृष्टीने उद्याने, शेततळे, जॉगिंग ट्रॅक करावेत, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले.

यावेळी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रातिनिधीक अडचणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऐकून घेतल्या व त्या तात्काळ सोडविण्यात येतील, असेही सांगितले.

प्रारंभी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा सत्कार महापारेषणचे संचालक (संचलन) अनिल कोलप यांनी केला. महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तमराव झाल्टे यांचा सत्कार संचालक (प्रकल्प) नसीर कादरी यांनी केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विभावरी बाविस्कर यांनी केले. मुख्य अभियंता (स्थापत्य) भूषण बल्लाळ यांनी आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, अजित पवारांचे आवाहन

News Desk

कोल्हापूरमधून निवडून येणार होतात तर… छगन भूजबळांची पाटलांना कोपरखळी

News Desk

बीड जिल्ह्यातील रोहन बहीर याला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Aprna