HW News Marathi
महाराष्ट्र

स्वार्थापोटी का होईना पण किशोरीताई…; नितेश राणेंचा दिशा प्रकरणावरून महापौरांना टोला

मुंबई | दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून आजही अनेक प्रश्न उपस्थित केले जाताना पाहायला मिळतात. आताही भाजप नेते यावरून राज्य सरकारला घेरत आहेत. या दोघांच्या मृत्यूचा योग्य तपास करण्यात यावा अशी मागणी भाजपचे नेते सातत्याने करत आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या पालकांची नुकतीच भेट घेतली आहे. मात्र, त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पेडणेकरांवर टीका केली आहे.

दिशा आणि सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दिशा आणि सुशांत यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणाच्या अहवालाविषयी मागणी केली आहे. तसेच दिशाच्या आईवडिलांची देखील त्यांनी भेट घेतली. पण त्यावरून नितेश राणेंनी पेडणेकर आणि राज्य सरकारला टोला लगावलाय.

नितेश राणे म्हणाले, “महापौर किशोरी पडणेकर यांना संजय राऊत दिशा सालियनवर चर्चा नको असे प्रेस कॅान्फर्नसमध्येच ठणकावत होते. पण ताई थांबल्या नाहीत. त्यांनी महिला आयोगाला पत्रही लिहले आणि सालियन परिवाराला मिडीयासोबत भेटही दिली”.

“इतकेच नाही तर याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात, असे स्वतःच जाहीर केले होते. त्यांचा हा उत्साह कदाचित आदित्य ठाकरेंनी जेव्हापासून छूपी घोषणा केली की ४५ वयोवर्ष वरच्या नगरसेवकांचे तिकीटे कापले जाईल त्यामुळेच असेल.”

“मुळात या प्रकरणाचं राजकारण सेनेच्या अंतर्गत वादामुळं होतंय. ज्याप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची चाललेली घौडदौड थांबविण्याठी किणी प्ररकरणाची रसद आतल्या गोटातूनच मिडीयाला देण्यात आली होती. तसेच काही आदित्यच्या युवासेनेला लगाम घालण्यासाठी घडत आहे.”

“असो, मी महापौरांना धन्यवाद देतो की त्या स्वार्थापोटी का होईना पण आमचा लढा लढत आहेत”, असा टोला राणेंनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पदभरतीसाठी कार्यवाही करावी! – उपमुख्यमंत्री

Aprna

अधिकाऱ्यांच्या अंगावर चिखल ओतणारेही तुमच्याच पक्षाचे होते, गडकरींच्या पत्रावरून भास्कर जाधवांची टीका!

News Desk

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी – खा. संभाजीराजे छत्रपती

News Desk