HW News Marathi
महाराष्ट्र

भगवत गीता पठणाला होत असलेला विरोध दुर्दैवी! – नितेशे राणे

मुंबई | बीएमसीच्या सर्व शाळेत भगवद गीता पठण करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी महापौर किरोशी पेडणेकर यांना काही दिवसांपूर्वी दिले होते. पालिकेच्या शाळेत भगवत गीता पठण करण्यात मागणी योगिता कोळींनी केल्यानंतर लगेच समाजवादी पार्टीने आक्षेप आणि विरोध दर्शविला आहे. या मागणीवर विरोध करणे ही दुर्दैवी असल्याचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

“भगवद् गीतेच महत्व जगाने ओळखलं आहे. त्यास विरोध करण्यासारखं काहीच कारण नाही. विद्यार्थ्यांनी गीता पठण करायचं नाही तर मग फतवा ए आलमगीरी चे पठण करायचे का? पण मला खात्री आहे हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून उद्धवजी ठाकरे या भगवद् गीता पठणाच्या विरोधाच्या दबापुढे झुकणार नाहीत,” असा विश्वास देखील नितेश राणेंनी त्यांच्या पत्रातून व्यक्त केला आहे. 

नितेश राणेंनी पत्रात नेमके काय म्हटले 

महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणाच्या ठरावाची सुचना महापौरांना भारतीय जनता पक्षाच्या योगिताताई कोळी यांनी केली. परंतू त्यावर लगेच समाजवादी पार्टी कडून आक्षेप व विरोध घेतला जातोय खरंतर हे दुर्दैवी व दुख:द आहे.

ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील योग ज्ञान जगाने स्वीकारले, अंगीकारले त्यात कोणत्याही धर्माचा अडसर नाही. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यापीठे, तत्ववेत्ते आणि विचारवंत तत्वज्ञानाच्या अभ्यासात भगवद् गीता या ग्रंथाला अन्यन साधारण महत्व देतात. अमेरिकेतील सेटॉन हॉल युनिव्हर्सिटीत तर भगवद् गीता आणि मॅनेजमेंट अशा पद्धतीचे कोर्सेसही शिकवले जात आहेत. संपूर्ण जग तत्वज्ञान ते कॉरपोरेट अशा सर्वच क्षेत्रात भगवद् गीतेच महत्व मान्य करत आहे. कारण हा ग्रंथ मानवी कल्याणाचा मार्ग सांगतो.

भगवद् गीता पठण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात महत्वाची भूमिका पार पाडेल, यात कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. परंतू आपल्याच देशात जर गीता पठणला विरोध होत असेल तर मग विद्यार्थ्यांना औरंजेबाचे ‘फ़तवा-ए-आलमगीरी’ चे पठण करायला लावायचे का? जेणेकरून मुख्तार अन्सारी सारखे माणसं यांना घरोघरी जन्माला घालता येतील?

मला खात्री आहे की स्व. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून अशा भगवद् गीता पठणाला होणाऱ्या विरोधाच्या दबावापुढे आपण झुकणार नाहीत आणि योगिताताई कोळींची सुचना मान्य करण्यास आपण पक्षप्रमुख म्हणून लगेचच निर्देशीत कराल ही आशा बाळगतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामाजिक न्याय विभागाच्या पद्ग्रहणाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडेंचे खास ट्विट

Aprna

मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला धक्कादायक वळण, बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर NCB चा छापा

Ruchita Chowdhary

मला जाणीवपूर्वक टार्गेट केल जात आहे !

News Desk