HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ दिग्गज उद्योजक राहुल बजाज अनंतात विलीन

मुंबई | ज्येष्ठ दिग्गज उद्योजक आणि पद्मभूषण राहुल बजाज यांचे पुण्यात निधन झाले होते. राहुल बजाज यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. राहुल बजाज हे अनंतात विलीन झाले आहेत. यांच्यावर आज (१३ फेब्रुवारी) पुण्यातील वैकुंठस्मशान भूमी येथे त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल बजाज यांना पुणे मुबंई महामार्गावरील आकुर्डी येथील बजाज कंपनी आवारात आज सकाळी १० ला राहुल बजाज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.  

दरम्यान, राहुल बजाज यांना उद्योग, कामगार, राजकीय आणि सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि योग गुरु बाबा रामदेव यांनी आदरांजली वाहिली.

राहुल बजाज हे बजाज ऑटो समूहामध्ये १९६८मध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते. गेल्या पाच दशके राहुल बजाज यांनी ऑटो समूहाचे नेतृत्व केले होते. राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी झाला. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. राहुल बजाज यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण पूर्ण केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात नऊ नवे चेहरे!

News Desk

दिल्लीत बसून शेती करता येत नाही, शरद पवारांनी मोदींना फटकारलं 

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये दरीत बस कोसळून ३३ जणांचा मृत्यू, २२ जखमी

News Desk