HW News Marathi
महाराष्ट्र

दिवशी प्रकल्पाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्देश

मुंबई । नांदेड जिल्ह्यातील दिवशी (बु.) (भोकर) प्रकल्पास 37 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. हा सिंचन तलाव मराठवाड्यातील 251 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असणारा मृद व जलसंधारण विभागाचा पहिलाच प्रकल्प असून या सिंचन तलावाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

जलसंधारण मंत्री गडाख म्हणाले, दिवशी (बु.) सिंचन तलावाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसह निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश देण्यात आले आहेत. या तलावाचे काम तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हा प्रकल्प दिवशी परिसरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या तलावामुळे दिवशी, कानी व पाकी या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या सिंचन तलावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यातील सिंचनाच्या अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जलसंधारण मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दिवशी सिंचन तलावासारख्या अधिक सिंचन क्षमतेच्या तलावास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येत असून याद्वारे राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांच्या निर्मितीमुळे ग्रामीण भागात विकासाला चालना! –  यशोमती ठाकूर

Aprna

दीपिकाच्या चेहऱ्यावरच फोकस करुन बळीराजाचा रोष दाबण्यासाठीचा हा खटाटोप राजू शेट्टी कडाडले

News Desk

महाराष्ट्रावर नवे संकट! परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यु

News Desk