HW News Marathi
महाराष्ट्र

BMC मध्ये उड्डाणपुलाच्या कामाच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदाराचा आरोप

मुंबई | मुंबईच्या उपनगरातील बोरिवली पश्चिम भागातील कोरो येथील एस. व्ही रोडवरील उड्डाणपुलाच्या कामाच्या कंत्राटमध्ये फेरफार झाल्याचा आरोप मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. याबाबत कोटेचांनी मुंबई बीएमसी आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहून संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोटेचांच्या पत्रानुसार, गेल्या वर्षी २५ ऑगस्ट रोजी स्थायी समितीने १२९ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ३०० कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मंजूर केले आहे?, हा प्रस्ताव मंजूर करताना कामाची व्यवहार्यता तपासली होती का?, असे अनेक  प्रश्न कोटेचांनी उपस्थित केले आहे. 

दरम्यान, आयुक्तांच्या परिपत्रकानुसार १५ टक्के फेरफार व्यवहार्य आहे. मग, ४०० टक्के अधिक रक्कमेचा फेरफार देणे व्यवहार्यता आहे का?, ३ वर्षानंतर कामाचे पूर्ण झाले नसेल तर सुधारित कसे व का  देण्यात आले? उर्वरित कामासाठी न देता दुसऱ्या कंत्राटदाराची का नियुक्ती करण्यात आली नाही?, वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून करिअप्पा उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील उतार ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पुढे वाढविण्याचे प्रस्तावित केलेले आहे. सदर काम केल्यानंतर वाहतुकीवर किती फरक पडणार आहे?, त्याचा अहवाल सदर केला आहे का?, यासारखे प्रश्न कोटेचांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून केले आहे

या कामात ३०० कोटीचा अतिरिक्त फेरफार झाल्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते आहे. तर या कामाची आपल्या विभागामार्फत चौकशी करून १५ दिवसांत अहवाल सादर करावा, या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, असे कोटेचांनी त्यांच्या पत्रातून म्हटले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साकीनाका बलात्कार प्रकरण, रामदास आठवले पीडितेच्या कुटुंबीयांना भेटणार, RPIतर्फे 1 लाख रुपयांची मदत!

News Desk

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

swarit

अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

News Desk